Satara District Bank Election : NCP कार्यालयावर आमदार शशिकांत शिंदे समर्थकांची दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार शशिकांत शिंदे समर्थकांची NCP कार्यालयावर दगडफेक

कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे. तसंच हे योग्य नसल्याचंही म्हटलं आहे.

आमदार शशिकांत शिंदे समर्थकांची NCP कार्यालयावर दगडफेक

सातारा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार शशिकांत शिंदे एका मताने पराभूत झाले. या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच काही मातब्बर नेत्यांनीच शशिकांत शिंदे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवाराला ताकद दिल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदेंच्या समर्थकांनी करत राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. शशिकांत शिंदे यांचा ज्ञानदेव रांजणे यांनी एका मताने पराभव केला. यामुळे संतापलेल्या शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली. यावर शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच कार्यकर्त्यांच्या या कृतीबद्दल शिंदे यांनी माफीसुद्धा मागितली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे व अपक्ष ज्ञानदेव रांजणे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रांजणे कट्टर समर्थक आहेत. या निवडणुकीत सहकार पॅनल मधील काही नेत्यांनी शशिकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला आहे.

हेही वाचा: 'मोठं कारस्थान', शशिकांत शिंदेंची पराभवानंतर प्रतिक्रिया

निवडणुकीत शशिकांत शिंदेना विजयी करा, असा निरोप खुद्द शरद पवार व अजित पवार त्यांनी जिल्ह्यातील मातब्बर श्रेष्ठींनी पाठविला होता. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचाही निरोप प्रमाण न मानता शशिकांत शिंदे यांना पाडण्याचे काम राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला. हा पराभव आपल्याच लोकांनी केल्याचे सांगत सुमारे 15 ते 20 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर तुफान दगडफेक केली. दगडफेकीनंतर कार्यकर्त्यांनी शशिंकांत शिंदे यांच्या नावाची घोषणाबाजीसुद्धा केली.

loading image
go to top