
इच्छुक ग्राहकांसाठी त्वरित कर्ज मंजुरी तसेच मोफत सिबिल तपासणी व मार्गदर्शन करण्यात येईल
सातारा : बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे उद्या (ता. 20) हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह येथे सकाळी साडेनऊ ते पाच या वेळेत एमएसएमई कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात उत्पादन, सेवा तसेच व्यापार क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजेची सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) अशा सर्व प्रकारांची कर्ज प्रकरणे एकाच छताखाली त्वरित मंजूर करण्यात येतील. बॅंक ऑफ महाराष्ट्रने एमएसएमई कर्जाचा व्याजदर रेपो रेटशी याआधीच संलग्न केल्याने बॅंकेचा व्याजदर इतर बॅंकांच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्ज हप्त्याचा भार कमी होईल. ग्राहकांनी इतर संस्थांमधून घेतलेल्या कर्जाचे, कर्ज अंतरण (टेक ओव्हर) करण्याची सोयही उपलब्ध आहे.
इच्छुक ग्राहकांसाठी त्वरित कर्ज मंजुरी तसेच मोफत सिबिल तपासणी व मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती सातारा विभागाच्या क्षेत्रीय व्यवस्थापिका श्रीमती अपर्णा जोगळेकर यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ