
-ऋषिकेश पवार
पुसेगाव : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरात पुसेगाव परिसरातील बहुतांश ठिकाणचे येरळा नदीचे काठ वाहून गेले आहेत. या पुरात येथील शेतीच्या दळणवळणासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बंधाऱ्याचे नुकसान झाल्याने नदीपात्राशेजारील शेत-शिवारात जाणारे रस्ते पूर्ण बंद झाले आहेत. याचा मोठा फटका नदीकाठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे.