

Inspiring Journey: Ajay Sutar Overcomes Financial Struggles to Become PSI
sakal
केळघर :यशाची खरी कहाणी ही अपयश, चिकाटी आणि कठोर मेहनतीतून घडत असते. ती केवळ ध्येय गाठण्याची नाही तर पडल्यावर पुन्हा जोमाने उभे राहण्याची जिद्द आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालण्याची कामगिरी करणाऱ्या जावळी तालुक्यातील केडंबे गावातील अजय नामदेव सुतार या युवकाची यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.