

Shashikant Shinde criticizes political betrayal, warns of strong public response.
sakal
पुसेगाव : यशवंत विचारांना हरताळ फासणाऱ्या आणि जनतेचा विश्वासघात करून दोन वेळा गद्दारी करणाऱ्या कर्णेंना स्वाभिमानी जनताच अद्दल घडवणार आहे. आम्ही त्यांना अध्यक्ष आणि नंतर सभापतिपद देण्याचा शब्द दिला होता. त्यांनी शेण खाल्ल्याने जनतेला मान खाली घालावी लागली. त्यांना जनाची आणि मनाचीही लाज नाही, असा घणाघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.