

Asha Bhosle enjoying traditional cuisine, reflecting her deep connection with Satara’s food culture.
sakal
-जयदीप पाठकजी
सातारा : सुरांच्या असंख्य रंगांनी रसिकांचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या आशाताई पाककलेतही पारंगत होत्या. ज्या आवाजाने हजारो गाणी अजरामर केली, त्याच व्यक्तिमत्त्वाने पाककलेच्या क्षेत्रातही तितक्याच रसिकतेने आपली छाप उमटवली होती. त्यांच्या खाद्यप्रेमाचे सूर साताऱ्याशी जुळलेले होते. साताऱ्यातील युसूफ बागवान यांनी बनवलेली बिर्याणी, सुके मटण, जर्दा (गोड भात) आशाताईंना विशेषप्रिय होता.