स्वप्नील शिंदे
सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कोरेगाव तालुक्यातील काही अकुशल मजुरांची मजुरी तांत्रिक चुकीमुळे अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याची कबुली रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नावरील उत्तरात सोमवारी दिली, तसेच संबंधित अकुशल मजुरांच्या मजुरीची रक्कम त्याच्या खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी उत्तरात म्हटले आहे.