esakal | जरंडेश्वर कारखान्याकडून सरकारची मालमत्ता हडप; भाजपचा गंभीर आरोप I Jarandeshwar Factory
sakal

बोलून बातमी शोधा

Jarandeshwar Sugar Factory

महसूल प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे.

जरंडेश्वर कारखान्याकडून सरकारची मालमत्ता हडप; भाजपचा गंभीर आरोप

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या (Jihe-Katapur Irrigation Scheme) मालकीच्या ११ एकर जमिनीवर जरंडेश्वर कारखान्याने (Jarandeshwar Sugar Factory) अतिक्रमण करत संरक्षक भिंत बांधून सरकारची कोट्यवधींची मालमत्ता हडप केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे बबनराव कांबळे (BJP Leader Babanrao Kamble) यांनी केला असून, याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे, की जिहे-कटापूर योजनेसाठी चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखान्याची गट क्रमांक ७९५ व ८०८ मधील अनुक्रमे ८० व ७७ गुंठे जमीन शासनाने संपादित केली आहे. शेत जमिनीच्या नोंदी २३ ऑक्टोबर २०१२ रोजी मंजूर झाल्या आहेत. जरंडेश्वर कारखान्याने संपूर्ण क्षेत्राला २० फूट उंचीची संरक्षक भिंत बांधली असून, रस्त्यासाठी अवैधरीत्या उत्खनन केलेल्या मुरूम व डबराची रॉयल्टी कारखान्याने बुडवली आहे. याबाबत महसूल प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे. अतिक्रमित क्षेत्रातून २५ फूट खोलीवरून जिहे- कटापूर योजनेची पाइपलाइन गेली असून, तेथून पाण्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. जरंडेश्वर कारखान्याने नुकसान भरपाई घेतली नसल्याचे सांगितले जाते. पाइपलाइनच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याने भविष्यात ही मालमत्ता कारखान्याची होऊ शकते. त्यामुळे तत्काळ कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा: BJP-NCP आमदारांच्या वादात 'रामाची' उडी; 'मध्यस्थी' येणार कामी?

आरोपांमध्ये तथ्य नाही

जरंडेश्वर शुगर मिलचे कार्यकारी संचालक व्ही. आर. जगदाळे यांनी ‘जरंडेश्वर’संदर्भातील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. कारखान्याने सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधली आहे, अतिक्रमण केले नाही. कॅंपसमधून ‘जिहे-कटापूर’ची पाइपलाइन गेली असून, तिच्या मेंटेनन्ससाठी कधीही, कोणतीही अडचण येणार नसल्याचे श्री. जगदाळे यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top