भिगवणच्या मोबाईल चोरट्यास बरडच्या पोलिसांनी पकडले

किरण बाेळे
Saturday, 14 November 2020

जय हिंद करिअर ऍकॅडमी येथे प्रशिक्षणार्थी मुले राहात आहेत. ते राहात असणाऱ्या पत्र्याचे शेडमध्ये प्रशिक्षणार्थी मुले झोपलेले असताना त्यांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी पळविले होते.

फलटण शहर (जि. सातारा) : वाजेगाव (ता. फलटण) येथील जय हिंद करिअर ऍकॅडमी येथे प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी मुलांचे मोबाईल चोरून नेलेल्या चोरट्याला फलटण ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बरड पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस पथकाने पकडून त्याच्याकडून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्वरूप ऊर्फ कौन्या दादासाहेब भोसले (रा. भिगवण, ता. इंदापूर) असे त्याचे नाव आहे.
 
याबाबत मिळालेली माहिती अशी, की 9 ऑक्‍टोबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वाजेगाव येथील जय हिंद करिअर ऍकॅडमी येथे प्रशिक्षणार्थी मुले राहात आहेत. ते राहात असणाऱ्या पत्र्याचे शेडमध्ये प्रशिक्षणार्थी मुले झोपलेले असताना त्यांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी पळविले होते. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी करून कौन्या भोसलेला भिगवण (ता. इंदापूर) येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल हस्तगत केले आहेत.

पुण्यात घरफोडीचे सत्र सुरु; पुणे शहर व जिल्हा पोलिसांच्यांवतीने गावाला जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले, पोलिस हवालदार कांबळे, पोलिस नाईक काशिद, तुपे, पोलिस जगदाळे, पाटोळे, कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhigwan Youth Arrested In Mobile Theft Case Near Phaltan Satara News