
कोंडवे : माणसाच्या रक्तात माणुसकी असेल, तर त्याच्याकडून होणाऱ्या समाजकार्याचा प्रत्यक्ष लाभ अनेक गरजूंना होतो. याच उद्देशाने प्रेरित होऊन कोंडवेचे सुपुत्र, तब्बल ५७ वेळा रक्तदान करणारे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दीपक भुजबळ यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.