
उंब्रज : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत दुचाकी व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघात झाला. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. अनिल राजाराम मेस्त्री (वय ५८, रा. मुक्तीचाळ, शास्त्रीनगर कोथरूड, पुणे) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.