साता-यात बर्ड फ्लू; तीन महिने काेंबडी, चिकन, अंडी विक्रीवर बंदी

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 19 January 2021

पशुवैद्यकीय विभागाने येथे एक किलोमीटर परिसरातील कोणाकडे कोंबड्या आहेत. त्यांची स्थिती काय आहे. याचा घरोघरी जाऊन सर्व्हे देखील पुर्ण झाला आहे. 

सातारा : मरिआईचीवाडी (ता. खंडाळा) येथील कापरे वस्ती व शिंदे वस्ती येथे काही दिवसांपुर्वी अचानक कोंबड्या व लोणंदमध्ये काही कावळे मृत झाले हाेते. पशुवैद्यकीय विभागाने मृत कोंबड्या व कावळ्यांचे स्वॅब पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले हाेते. त्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानूसार या भागातील काेंबडयांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट हाेत आहे.

मरिआईचीवाडी (ता. खंडाळा) येथील कापरे वस्ती व शिंदे वस्ती येथील घरगुती पोल्ट्री फार्ममधील 85 ते 90 कोंबड्या रोगामुळे दगावल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दहा किलोमीटरचा परिसर "सतर्क क्षेत्र' म्हणून नुकताच घोषित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार लोणंद शहरातील चिकन विक्रीची सर्व दुकाने, पोल्ट्री फॉर्म व दर गुरुवारी कोंबड्यांचा भरणारा आठवडे बाजारही पुढील आदेशापर्यंत बेमुदत बंद ठेवण्यात आला आहे.

काळभैरवनाथ युवा पॅनेलचा अल्प मताने पराभव; निकालावर आक्षेप
 
कापरे वस्ती व शिंदे वस्ती परिसरातील एक किलोमीटर अंतराचा परिसर "अतिसतर्क क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले असून, लोणंदचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरकुमार मुळे व त्यांचे सहकारी हे जिल्हा पशुवैद्यकीय उपआयुक्त डॉ. अंकुश परिहर व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उपाययाेजना केल्या जात आहेत. येथे एक किलोमीटर परिसरातील कोणाकडे कोंबड्या आहेत. त्यांची स्थिती काय आहे. याचा घरोघरी जाऊन सर्व्हे देखील पुर्ण झाला आहे. 

दरम्यान पशुवैद्यकीय विभागाने मृत कोंबड्या व कावळ्यांचे स्वॅब पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले हाेते. त्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानूसार या भागातील काेंबडयांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट हाेत आहे. याबाबत पशुवैद्यकीय विभागाने अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे ई-सकाळशी बाेलताना सांगितले.

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात युवती ठार; मुंढेत शाेककळा

खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे बर्ड फ्लू या रोगाचे निदान झाल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी बाधित जागेचा केंद्रबिंदू धरुन एक किलाे मीटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र हे संक्रमीत क्षेत्र व दहा किलाे मीटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र हे सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
 
तसेच जिल्ह्यात संभाव्य बर्ड फ्लू या रोगाचा प्रसार रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथील बाधित जागेच्या केंद्रस्थानापासून संक्रमित क्षेत्र व सर्वेक्षण क्षेत्रामधील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्म मधील पक्षी व इतर प्रजातीचे पाळीव पक्षी यांची जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सातारा यांच्या अंतर्गत स्थापित जलद प्रतिसाद पथकामार्फत शास्त्रोक्त पध्दतीने पक्षांना मारण्याची क्रिया करण्यात यावी. 

मृत पक्ष्यांची मार्गदर्शक सूचनेनुसार विल्हेवाट लावण्यात यावी. संक्रमित क्षेत्रातील पक्षीखाद्य घटक अंडी, अंडयाचे पेपर ट्रे, बास्केट खुराडी व पक्षी खत / विष्टा इ. चे शास्त्रोक्त पध्दतीने नष्टीकरण करुन विल्हेवाट लावण्यात यावी. संक्रमीत क्षेत्रामधील पक्षांची कलींग, स्वच्छता, निर्जंतुकीकरण इ. मोहिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुक्कुट पक्षी / चिकन व अंडी विक्रीची दुकाने सुरु करण्यास व यांमध्येही फक्त सर्वेक्षण क्षेत्रामधील उत्पादित कुक्कुट पक्षी व अंडी यांची अंतर्गत होणारी हालचाल व विक्रीस परवानगी राहील. सर्वेक्षण क्षेत्रामध्ये बाहेरुन येणारे व बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रिया उत्पादने/कुक्‌कुट पक्षी, खाद्य व अंडी आदींची हालचाल, विपणन व विक्रीवर तीन महिने बंदी लागू राहील.

हणबरवाडी येथील सतर्क क्षेत्रातील बंदी आदेश रद्द

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार मौजे हणबरवाडी येथे यापूर्वी लागू केलेला सतर्क क्षेत्रातील मनाई व बंदी आदेश येथील मृत पक्ष्यांचे अहवाल हे नकारार्थी आल्याने रद्द करुन लागू करण्यात आललेली मनाई व बंदी उठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.

उदयनराजेंच्या त्या कृतीची पोलिसांकडे माहिती गोळा; गृहराज्यमंत्र्यांचा निर्वाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Flu Virus Enters In Satara Beraking News Trending News