

Satara–Pandharpur Highway Accident Claims Two Lives on Birthday
sakal
म्हसवड: सातारा- पंढरपूर मार्गावरील पिलीवनीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हर्षवर्धन शिरतोडे (वय १८, रा. खडकी, ता. माण) आणि स्वप्नील सुळे (वय १८, रा. सुळेवाडी, ता. माळशिरस) अशी मृतांची नावे आहेत.