वाईत महागणपती घाटावर घंटानाद; महाबळेश्वर, पाचगणीत भाजपचे भजन आंदोलन

भद्रेश भाटे
Sunday, 30 August 2020

"दार उघड उद्धवा दार उघड' अशी हाक देत "घंटानाद आंदोलन" करताना कार्यकर्त्यांनी भजन, कीर्तन, सत्संग, तसेच गणपती अथर्वशीर्ष व गणपतीची आरती करून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला.
 

भिलार (जि. सातारा) : धार्मिक स्थळे तातडीने खुली करावीत, या मागणीसाठी नुकतेच महाबळेश्वर व पाचगणी येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे व महाबळेश्वर तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद व भजन आंदोलन करण्यात आले.
 
भजन, घंटा वाजवून, निषेध फलक व घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. या आंदोलनात चेतन पार्टे, शेखर भिलारे, प्रकाश भिलारे, सन्नी मोरे, दीपक बावळेकर, तानाजी दाभाडे, आनंदा बिरामणे, मंगेश उपाध्याय, जगन्नाथ भिलारे, अजित सपकाळ, शंकर आब्राळे, बाळासाहेब आब्राळे, सुनील जाधव, भिकूदादा शिंदे, मारुती भिलारे, राजू भिलारे, जयवंत बिरामणे, संतोष मोरे, नयन मोरे, रोहन कदम, अंकिता मोरे यांची उपस्थिती होती.

माजी सैनिकांसाठी पुण्यात चालून आलीय सुवर्णसंधी

वाई  (जि.सातारा) : सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी सुरू करा, या मागणीसाठी शहर भारतीय जनता पक्षातर्फे महागणपती घाटावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. "दार उघड उद्धवा दार उघड' अशी हाक देत "घंटानाद आंदोलन" करताना वाई शहरातील कार्यकर्त्यांनी भजन, कीर्तन, सत्संग, तसेच गणपती अथर्वशीर्ष व गणपतीची आरती करून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला.

दरोडा फसला अन् नागरिकांनी धु-धु धुतला! 

या वेळी शहराध्यक्ष राकेश फुले, जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, चिटणीस यशवंत लेले, प्रतापगड उत्सव समिती प्रमुख श्रीमती विजयाताई भोसले, अर्बन बॅंक चेअरमन सी. व्ही. काळे, देवानंद शेलार, मनीषा घैसास, काशिनाथ शेलार, यशराज भोसले, अजित वनारसे, नगरसेविका वासंती ढेकाणे, अली आगा, महेश कोकरे, तेजस जमदाडे, शुभदा नागपूरकर, केतन रासकर, नरेंद्र महाजन, रामदास खरात, डॉ. शस्मिता जैन, मंजूषा भाटे कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हांला आठ दिवसांचा लॉकडाउन हवाय, व्यापाऱ्यांची मागणी 

श्रीरंग दिवेकर, प्रसाद चरेगावकर, दीपक जाधव, अजय कामठे, तुषार सुळके, अरविंद बोपर्डीकर, गुलाब डोंगरे, विश्वनाथ जगताप, विजय विभूते, आनंद सुकाळे, सुनील शिंदे, ज्योती गांधी, किरण फरांदे, केदार राजपूत, संजय डोईफोडे, सुषमा शिंदे, मानसी पटवर्धन, विनया सुरत्राण, रूपाली गव्हाणे, भारती कुलकर्णी, प्रणित मोरे, आदित्य गांधी, आशिष जमदाडे, अमित जमदाडे, सुधीर जमदाडे, कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Agiation In Wai Mahableshar Panchgani To Reopen Temples