esakal | 'महाविकास'कडून OBC समाजाचा विश्वासघात; सरकारविरोधात भाजप आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज कऱ्हाडात आंदोलन करण्यात आले.

'महाविकास'कडून OBC समाजाचा विश्वासघात; सरकारविरोधात भाजप आक्रमक

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : भाजपच्या दक्षिण व ओबीसी आघाडीतर्फे येथील दत्त चौकात महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध करण्यात आला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर केल्याबद्दल निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिगे यांना निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी दत्त चौकात केली. सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र, आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत.

हेही वाचा: भाजप खासदार उदयनराजे शिवसेनेच्या दिग्गज नेत्याच्या भेटीला

इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे. त्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर ,जिल्हा सरचिटणीस महेंद्र डुबल, शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे, अल्पसंख्यांक आघाडी शहराध्यक्ष नितीन शहा, अनुसूचित मोर्चा शहराध्यक्ष सागर लादे, ओबीसी आघाडी शहराध्यक्ष सुनील नाकोड, दक्षिण विधानसभाचे प्रभारी धनाजी माने, भटक्या विमुक्त आघाडीचे मानसिंग कदम, कामगार आघाडीचे संयोजक विश्वनाथ फुटाणे, अभिजीत कोठावळे, संतोष हिंगसे, सूर्यकांत खिलारे, नितीन वास्के ,बापू जंत्रे, विवेक भोसले उपस्थित होते.

loading image
go to top