esakal | पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ कऱ्हाडात भाजपचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ कऱ्हाडात भाजपचे आंदोलन

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : पश्चिम बंगालमधील (West Bengal) हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे (BJP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज बुधवारी येथे कोरोनाचे नियम पाळून घरीच आंदोलन केले. संबंधितांच्या कुटुंबातील सदस्यांनी या आंदोलनात भाग घेतला. (BJP Agitation In Karad To Protest Violence In West Bengal Satara News)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तेथे सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसकडून हल्ले होत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने निदर्शने केली.

कऱ्हाडात कडक Lockdown; घरपोच सेवा देणाऱ्यांची कोरोना तपासणी सुरू

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, घनश्याम पेंढारकर, प्रमोद शेंडे, नितीन वास्के, प्रशांत कुलकर्णी, उल्हास बेंद्रे, विशाल कुलकर्णी, शैलेश गोंदकर, रुपेंद्र कदम, विवेक भोसले, सागर लादे, सौ. घारगे, भाग्यश्री रोकडे, विश्वनाथ कुडाले, नितीन शहा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पाळून घरीच हे आंदोलन केले. त्यामध्ये संबंधितांच्या कुटुंबातील सदस्यही सहभागी झाले होते.

BJP Agitation In Karad To Protest Violence In West Bengal Satara News