esakal | कऱ्हाडात कडक Lockdown; घरपोच सेवा देणाऱ्यांची कोरोना तपासणी सुरू

बोलून बातमी शोधा

Covid 19 Test

कऱ्हाडात कडक Lockdown; घरपोच सेवा देणाऱ्यांची कोरोना तपासणी सुरू

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातार) : कडक लॉकडाउनमध्ये (Lockdown) शहरातील नागरिकांना किराणा व भाजीपाला घरपोच देण्याची सुविधा पालिकेतर्फे करणार आहे. त्याचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. कोरोना (Coronavirus) पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 117 पैकी सहा व्यापारी पॉझिटिव्ह (Covid 19 Positive) आल्यानेही शहरात खळबळ उडाली आहे. (karad covid 19 positive satara marathi news)

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनच्या काळात घरपोच भाजीपाला किट पोच केली जाणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी डाके यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार त्यांना पास दिले जाणार आहेत. त्यानंतर त्यांना किराणा, भाजीपाला देण्याची परवानगी मिळणार आहे. लॉकडाउनमुळे पालिकेने किराणा माल, दूध विक्री, भाजीपाला अंडी विक्री करणाऱ्यांची प्रभागनिहाय यादी केली आहे. त्यानुसार शहरातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली जाणार आहे.

त्याबाबत मुख्याधिकारी डाके म्हणाले, ""लॉकडाउनच्या काळात परवानगी दिल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यास पालिकेने आजपासून सुरवात केली आहे. दिवसभरात पालिकेने 117 व्यापाऱ्यांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यातील सहा व्यापारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अन्य व्यापाऱ्यांची तपासणी करावीच लागणार आहे. शहरातील भाजी विक्री केंद्रांची संख्या विचारात घेऊन उद्या त्याचे नियोजन होईल. भाजीपाला, किराणा माल घरपोचची तयारी सुरू आहे. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मोबाईलद्वारे मागणी नोंदवणाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्या वस्तू घरपोच केल्या जाणार आहेत. त्यासाठी स्वयंसेवक नियुक्त केले जाणार आहेत.''

हेही वाचा: आरक्षण रद्द हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी प्रसंग : संभाजीराजे

सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा: लॉकडाउन "कडक'; पण रस्त्यांवर गर्दी!