Leaders and workers display strength while filing nomination forms during Satara district elections.
Sakal
सातारा
Satara District Politics: सातारा जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी आमने-सामने; शक्तिप्रदर्शनाने १५०५ अर्ज; शिंदेंच्या शिवसेनेचेही आव्हान!
Shinde Shiv Sena challenge in Satara politics: साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने; निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ५५८ व पंचायत समितीसाठी ९४७ असे एकूण १५०५ अर्ज दाखल झाले. बहुतांशी गट, गणात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात दोन्ही राष्ट्रवादीच्या घड्याळाचे व शिंदेंच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे आव्हान दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात शिवसेना व भाजपमध्ये लढत होत असून, फलटणमध्ये भाजप-राष्ट्रवादी युतीविरोधात शिंदेंची शिवसेना, तर कोरेगावात शिंदेंची शिवसेना व राष्ट्रवादी अशी लढत दिसत आहे.

