

BJP Strengthens Karad Civic Unit with New Leadership
Sakal
कऱ्हाड: भाजपचे नगरसेवक विजय वाटेगावकर यांची पालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी एकमताने निवड झाली. श्री. वाटेगावकर विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहणार आहेत. नगरसेवक शिवाजी पवार यांची पक्षप्रतोदपदी निवड झाली. श्री. वाटेगावकर यांच्या अनुपस्थितीत श्री. पवार हे त्यांचे काम पाहतील. त्या संबंधितच्या नोंद पक्षाने आज जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली.