

Malkapur Sees Political Shift: Lotus Blooms, BJP Secures Majority
Sakal
-राजेंद्र ननावरे
मलकापूर : येथील पालिका निवडणुकीत मनोहर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा कमळ फुलले. भाजपला नगराध्यक्षपद तसेच २२ पैकी १८ जागा मिळाल्या. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनवले यांनी ५२७७ मताधिक्याच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. श्री. सोनवले यांना १० हजार ७४९, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार आर्यन कांबळे यांना ५४७२, तर शिवसेना शिंदे गटाचे अक्षय मोहिते यांना ७०४ मते मिळाली. निवडणुकीत भाजपला १८, तर राष्ट्रवादी व आघाडीला चार जागा मिळाल्या.