

Strategic political discussions intensify in Satara as BJP leaders plan ZP power equations.
sakal
सातारा : जिल्हा परिषदेत सत्तेच्या समीकरणांवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलविल्याचे समोर आले होते. या घडामोडींमुळे भाजपनेही सावध होत झेडपीची सत्ता मिळविण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपकडून सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.