Karad News: घंटागाड्या बंद असतानाही ठेकेदांराची बील कशी देता; कऱ्हाडला भाजपचे नगरसवेक संतप्त, मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट!

Karad municipal council garbage collection controversy: कऱ्हाडमध्ये घंटागाड्या बंद, ठेकेदारांना बील कसे दिले जाते? भाजप नगरसेवकांचा संताप
BJP corporators meet Chief Officer in Karad over alleged irregularities in garbage van contractor payments.

BJP corporators meet Chief Officer in Karad over alleged irregularities in garbage van contractor payments.

esakal

Updated on

कऱ्हाड: शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्या बंद आहेत, कचरा गोळा करण्यासह त्याचे व्यवस्थापन कोलमडले आहे, असे असताना ठेकेदारांची बील अदा कशी करता, शहरातील व्यवस्थापन बिघडलेले असताना ठेकेदारांचा लाड करण्याचे कारण काय, अशी विचारणा करत भाजपच्या नगरसवेकांना आज पालिकेत मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना जाब विचरला. दै. सकाळने घंटागाड्यांना विरोधक लावणार शिस्त आशायाचे वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत भाजपच्या नगरसवेकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जावून प्रत्यक्षात विचारणा केली. विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेत घनकचऱ्यासहीत बिघडलेल्या कचरा व्यवस्थापनाबाबत मुख्याधिकारी व्हटकर यांच्याशी चर्चा करत त्यांच्या काही आग्रही मागण्याही मांडल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com