काॅंग्रेसच्या माेठ्या नेत्याला घेरण्याची भाजपची खेळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

तालुक्‍यासह जिल्ह्यात मोट बांधण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी नव्याने झालेल्या कार्यकारिणीच्या निवडीत सातारा जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. या निवडी करताना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे व आगामी निवडणुकीतील यशाची गोळाबेरीज करणे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.

कऱ्हाड : भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या झालेल्या निवडीत पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याला "फोकस' केले आहे. जिल्ह्यातील तब्बल पाच जणांची वेगवेगळ्या पदांवर वर्णी लावली आहे. त्यामुळे पुढच्या राजकीय उलाढालीत भाजपकडून जिल्हा "टार्गेट' होणार हे निश्‍चित. त्या अनुषंगानेच निवडीकडे पाहिले पाहिजे, असे संकेत भाजपने राजकीय गोटात दिले आहेत. कऱ्हाड दक्षिणेतही वेगळी "फिल्डिंग' लावत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाही "टार्गेट' केले आहे. त्यासाठी पाच पैकी तिघे पदाधिकारी हे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दिले आहेत. 

खासदार उदयनराजे भोसले, वाईचे मदन भोसले, कऱ्हाड दक्षिणचे अतुल भोसले यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांना कार्यकारिणीवर तर सहकार सेलच्या सहसंयोजकपदावर शेखर चरेगावकर यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे या निवडी अधिक विचारपूर्वक केल्याचे दिसते. पाचपैकी तीन निवडी कऱ्हाड दक्षिणेतील आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना घेरण्याची खेळी केली आहे, असे म्हणायला वाव आहे. 

भाजपकडून पाच वर्षांपासून वेगवेगळ्या खेळी करत जिल्ह्यातील राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील काही खेळी यशस्वीही झाल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे अशा दिग्गजांना भाजपने गोटात घेऊन जिल्ह्यात दोन्ही कॉंग्रेसला शह दिला. मात्र, तरी त्यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना चित करण्यासाठी नगरसेवकांपासून त्यांचे निकटवर्तीय व थिंक टॅंकमधील माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यापर्यंत त्यांनी फिल्डिंग लावली. भाजपने केलेल्या या व्यूव्हरचनेमुळे बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात दोन्ही कॉंग्रेसला विजयासाठी धावपळ कारावी लागली, हे कोणाला नाकारता येणार नाही. भाजपने संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा त्यांना फायदा झाला. त्या कालवधीत भाजपने कऱ्हाड पालिका निवडणुकीत शहराच्या नगराध्यक्षापदालाही गवसणी घातली. त्यात भाजपने शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शेखर चरेगावकर, अतुल भोसले यांची एकत्रित ताकद महत्त्वाची ठरली. त्यानंतर विधानसभेला गवसणी घालण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण आहे. त्या एकजुटीला कायम ठेवण्यासाठी भाजप आटापिटा करत आहे, त्यात स्थानिक राजकारणामुळे अद्याप यश आलेले नाही. तालुक्‍यासह जिल्ह्यात मोट बांधण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी नव्याने झालेल्या कार्यकारिणीच्या निवडीत सातारा जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. या निवडी करताना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे व आगामी निवडणुकीतील यशाची गोळाबेरीज करणे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. वर्षभरात पालिकांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका पुन्हा एकदा आपल्याच बाजूने खेचून घेण्यासाठीही पक्षाचा आटापिटा दिसतो आहे.

कोट्यवधींचे कर्ज देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यांतील दोघांवर फसवणुकीचा साताऱ्यात गुन्हा
 

भोगावच्या सहायक पोलिस निरीक्षकास साताऱ्यात पडली लाखाेंची भुरळ अन्...

पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आला नवा आदेश; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

सर्व रेशनकार्डधारकांना 31 जुलैपर्यंत मिळणार या याेजनेचा मोफत लाभ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Decleared Western Maharashtra Commiittee