

Rupali Waragade Wins Medha Mayor Post by Just 46 Votes
Sakal
-अर्चना पवार
कास : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या मेढा नगरपंचायतीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह ११ जागा जिंकत वर्चस्व राखले; परंतु नगराध्यक्षपदासाठी त्यांना अखेरपर्यंत झुंज द्यावी लागली. अखेर भाजपच्या रूपाली वारागडे यांचा ४६ मतांनी निसटता विजय झाल्याने नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडत, गुलालाची उधळण केली.