
पाटण : गेली ११ वर्षे विरोधकांकडून होणारी अडवणूक, कार्यकर्त्यांची पिळवणूक, जबरदस्तीने झालेले पक्षप्रवेश आणि दबावाचे राजकारण या सर्व प्रकारचा त्रास सहन करण्याची मर्यादा संपली आहे. भाजपसोबत सत्तेत जाण्याचा ठाम निर्णय पाटणकर गटाने आज आयोजित मेळाव्यात एकमुखी घेतला. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही तालुक्यातील डोंगर कपारीतील गावागावांतून कार्यकर्ते मेळाव्यासाठी जमा झाले होते. युवकांबरोबर ज्येष्ठ कार्यकर्तेही उपस्थित होते.