
कऱ्हाड : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले यांची वर्णी लागल्याने भाजपच्या कऱ्हाड गोटात चैतन्य निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा भाजपने कऱ्हाडला ताकद दिली आहे. जिल्हाध्यक्षपदामुळे आमदार डॉ. भोसले यांची पक्षीय जबाबदारीही आता वाढली आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार डॉ. भोसले यांना जिल्ह्यात भाजपची ताकद निर्विवाद राहण्याच्या दृष्टीने कसब पणाला लावावे लागणार आहे.