

Political discussions underway among party leaders amid speculation over co-opted posts in Karad.
Sakal
कऱ्हाड: पालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता. १६) विशेष सभा हाेत आहे. त्यासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याने आघाड्यांपुढे निवडीचा पेच निर्माण झाला आहे. लोकशाही-यशवंत आघाडीला दोन, तर भाजपला एक स्वीकृत नगरसेवकपद वाट्याला येणार आहे. त्यातही भाजपसह यशवंत आघाडीकडे स्वीकृतपदासाठी इच्छुकांची गर्दी असल्याने त्यांच्याकडून प्रत्येक वर्षासाठी एक असा पर्याय निवडला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप, तसेच यशवंतकडून पाच वर्षांत १० जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. लोकशाहीकडून आघाडीचे नेते सुभाष पाटील किंवा आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी नेमकी काेणाची वर्णी लागणार? याचा अंतिम निर्णय माजी मंत्री बाळासाहेब पाटील घेणार आहेत.