

Minister Gore Strengthens Hold as BJP Wins Key Posts in Satara
sakal
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडी वेळी अल्पमतात असतानाही भाजपने राजकीय खेळी करून अध्यक्षपद मिळवत आपणच धुरंदर असल्याचे सिद्ध केले होते. आजच्या सभापती निवडी वेळीही त्यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेला इंगा दाखवत ‘धुरंदर पार्ट टू’चे दर्शन घडवले. चारही सभापतिपदे आपल्या पदरात पाडून घेतली. भाजपकडून लोकशाहीची ही अवहेलना सुरू आहे, असा आरोप करत कांगावा करण्याशिवाय विरोधकांच्या हाती आजही काही लागले नाही.