वाठार, बेलवडे, आणे सोसायटीवर भाजपच्या भोसलेंचं वर्चस्व

BJP vs Congress
BJP vs Congressesakal
Summary

निवडणुकीत भोसले गटासह आमदार पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील-उंडाळाकरांच्या समर्थकांनी चुरशीनं सहभाग घेतला होता.

कऱ्हाड (सातारा) : सेवा सोसायटींच्या निवडणुकीत (Karad Society Election) यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे (Yashwantrao Mohite Krishna Sugar Factory) अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले (Atul Bhosle) प्रणीत पॅनेलनी वाठार येथे सत्तांतर घडवले. बेलवडे बुद्रुक, आणे येथील सत्ता कायम ठेवली.

कऱ्हाड दक्षिणमधील वाठार, बेलवडे बुद्रुक व आणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटींची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत भोसले गटासह माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळाकर (Udaysingh Patil-Undalkar), अविनाश मोहिते, इंद्रजित मोहिते, राजेश पाटील-वाठारकर यांच्या समर्थकांनी चुरशीने सहभाग घेतल्याने निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. वाठार सोसायटीच्या निवडणुकीत भोसले प्रणीत श्री म्हसोबा परिवर्तन शेतकरी पॅनेलने १३ पैकी १० जागांवर विजय मिळवून सत्तांतर घडवले.

BJP vs Congress
Political News : अवघ्या 40 दिवसांत दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश

तेथे आमदार चव्हाण, अॅड. उंडाळाकर, अविनाश मोहिते, इंद्रजित मोहिते, राजेश पाटील-वाठारकर समर्थक सत्ताधारी श्री म्हसोबा शेतकरी पॅनेलला केवळ तीन जागांवरच समाधान मानावे लागले. चुरशीने झालेल्या बेलवडे बुद्रुक सोसायटीतही भोसले समर्थक सत्ताधारी शेतकरी सभासद सेवा सहकारी पॅनेलने १३ पैकी १० जागांवर विजय मिळवून सत्ता कायम राखली. विरोधकांना तेथे पराभवाला सामोरे जावे लागले. आणे विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भोसले समर्थक ज्योतिर्लिंग सहकार पॅनेलने सर्वच जागांवर विजय मिळवून विजयाची परंपरा कायम ठेवली. विरोधी आमदार चव्हाण व अॅड. उंडाळकर समर्थक गटाला तेथे पराभव पत्करावा लागला. सर्व विजयी उमेदवार, पॅनेलप्रमुखांचे कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भोसले, अतुल भोसले यांनी अभिनंदन केले.

BJP vs Congress
'हिजाबला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे हात कापून टाकू'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com