Political News : अवघ्या 40 दिवसांत दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश

Balwinder Singh Laddi Joins BJP
Balwinder Singh Laddi Joins BJPesakal
Summary

आमदारानं काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती.

Punjab Assembly Election 2022 : पंजाबमधील हरगोविंदपूरचे आमदार बलविंदर सिंह लड्डी (Balwinder Singh Laddi) यांनी पुन्हा भाजपात (BJP) प्रवेश केलाय. अवघ्या 40 दिवसांत लड्डींनी तिसऱ्यांदा पक्ष बदलला. यापूर्वी लड्डी यांनी काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडणूक जिंकली होती. दरम्यान, 28 डिसेंबर रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 3 जानेवारीला पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि पुन्हा एकदा भाजपात दाखल झाले. 3 जानेवारीला लड्डींनी हरीश रावत (Harish Rawat) आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आमदार बलविंदर लड्डी यांनी याआधी 28 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत भाजपात प्रवेश केला होता. लड्डी हे कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांचे एकनिष्ठ मानले जाते. मात्र, त्यांनी कॅप्टनच्या नव्या पक्षात प्रवेश न करता भाजपात प्रवेश केला. कॅप्टन अमरिंदर यांनी विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) भाजपसोबत युती केलीय. मात्र, 3 जानेवारीला त्यांनी भाजपला दणका देत काँग्रेसमध्ये परतले.

Balwinder Singh Laddi Joins BJP
'विकेट' नाही मिळाली म्हणून अंपायरवर राग; PM मोदींनी विरोधकांना सुनावलं

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी बटाला येथे लड्डी यांचा भाजपमध्ये समावेश करुन घेतला. बटाला येथील भाजपचे उमेदवार फतेहजंग बाजवाही इथं उपस्थित होते. लड्डी हे देखील बाजवा गटाचे मानले जातात. हरगोविंदपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसनं लड्डी यांना तिकीट नाकारलं आहे आणि त्यांच्या जागी मनदीप सिंह यांना तिकीट दिलंय. भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, लड्डी यांनीही आपली चूक झाल्याचं म्हटलं होतं. लड्डी म्हणाले होते, माझा जन्म काँग्रेसमध्ये नेता म्हणून झालाय. भाजपात जाणं हा चुकीचा निर्णय होता. सुरुवातीला मला वाटलं की, काँग्रेस माझ्याकडं दुर्लक्ष करत आहे; पण नंतर नेतृत्वानं मला बोलावून माझं म्हणणं ऐकून घेतलं, असं त्यांनी नमूद केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com