esakal | '..तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Maratha Morcha

भाजप सरकारच्या काळात लाखो मराठा समाजबांधवांच्या सहभागाने मोर्चे निघाले. आम्ही त्या सर्व मोर्चांचा सन्मान केला.

'..तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही'

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) सोलापूरमध्ये झालेल्या मोर्चाच्या (Solapur Maratha Morcha) विरोधामध्ये शिवसेना (ShivSena), काँग्रेस (Congress Party), राष्ट्रवादीच्या (NCP) महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) प्रचंड पोलिस बळ वापरून दडपशाही केली. त्याचा भारतीय जनता पक्षातर्फे (Bharatiya Janata Party) तीव्र निषेध करतो. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही हे ध्यानात ठेवावे, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे (BJP vice president Jayakumar Shinde) यांनी दिला आहे. (BJP Leader Jayakumar Shinde Criticizes Mahavikas Aghadi Government On Maratha Reservation Issue Satara Marathi News)

सरकारने प्रचंड दडपशाही करूनही मराठा समाजातील बांधवांनी, आंदोलकांनी मोर्चा काढल्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, असे स्पष्ट करून श्री. शिंदे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण न्यायालयाकडून रद्द झाले. त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील (Narendra Patil) व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व भाजप व मित्र पक्षाचे आमदार व लोकप्रतिनिधींनी रविवारच्या सोलापूरमधील मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील गावोगावातून हजारो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठा स्त्री-पुरुष सोलापूरकडे रवाना झाले होते. पण, सरकारने पोलिसी बळाचा वापर करून ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांना अडवले आणि सोलापूरमधील मोर्चा होऊ नये, यासाठी दडपशाही केली. मराठा समाजातील समन्वयकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या. पण, अशी दडपशाही करून सरकार मराठा समाजाचा आक्रोश दाबू पाहत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दबाव आणला तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: 'ठरावाचं अवमूल्यन करणाऱ्या नगराध्यक्षांविरोधात कारवाई करा'

भाजप सरकारच्या काळात लाखो मराठा समाजबांधवांच्या सहभागाने मोर्चे निघाले. आम्ही त्या सर्व मोर्चांचा सन्मान केला. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा मोर्चाच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करून अंमलबजावणी केली. पण, महाविकास आघाडी सरकारचा मराठा समाजाबद्दल एवढा राग आहे की, मराठा समाजाने आपल्या मागण्या मांडणेसुद्धा त्यांना सहन होत नाही. मराठा समाजाने सोलापूरमध्ये रविवारी आयोजित केलेला मोर्चा राजकीय नव्हता. तेथे कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही पक्षाचा झेंडा आणि बिल्ला बाजूला ठेवून सहभागी झाले होते. पण, मराठा समाजाचे आरक्षण घालविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला आता समाजाचा आवाजही दडपायचा आहे असे दिसते. पण, त्यांचा हा हेतू सफल होणार नाही. ते जितकी दडपशाही करतील तितका मराठा समाजातील संताप उफाळेल, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा सूचक इशाराही श्री. शिंदे यांनी दिला आहे.

BJP Leader Jayakumar Shinde Criticizes Mahavikas Aghadi Government On Maratha Reservation Issue Satara Marathi News

loading image