esakal | 'ठरावाचं अवमूल्यन करणाऱ्या नगराध्यक्षांविरोधात कारवाई करा'
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor Rohini Shinde

सभापती हुलवान यांनी मुख्याधिकारी डाके यांच्याकडे तक्रार केली होती. ती तक्रार दाखल झाल्याचे समजताच विनापरवाना फ्लेक्सही गायब झाले आहेत.

'ठरावाचं अवमूल्यन करणाऱ्या नगराध्यक्षांविरोधात कारवाई करा'

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : कृष्णा कारखान्यात (Krishna Sugar Factory Election) विजयी सहकार पॅनेलच्या (Co-operation panel) अभिनंदनाचे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी लावलेल्या फ्लेक्सचे शुल्क भरले नाही, कोणतीही परवानगी घेतली नाही. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी तसे लेखी कळवले आहे. वास्तविक अभिनंदन, वाढदिवस आदींचे शुभेच्छा फ्लेक्स पालिका लावणार नाही, असा ठराव नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याच अध्यक्षतेखालील मासिक बैठकीत झाला होता. त्याच ठरावाचे दस्तुरखुद्द नगराध्यक्षांनी अवमूल्यन केले आहे. त्यामुळे पालिकेने (Karad Municipality) त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती स्‍मिता हुलवान (Speaker Smita Hulwan) यांनी केली आहे. (Karad Municipality Speaker Smita Hulwan Is Aggressive Against Mayor Rohini Shinde Satara Political News)

सभापती हुलवान यांनी मुख्याधिकारी डाके (Chief Officer Ramakant Dake) यांच्याकडे तक्रार केली होती. ती तक्रार दाखल झाल्याचे समजताच विनापरवाना फ्लेक्सही गायब झाले आहेत, त्याचीही चौकशी करण्याची मागणी हुलवान यांनी केली आहे. याबाबत हुलवान म्हणाल्या, ‘‘नगराध्यक्षा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची जानेवारीत मासिक बैठक झाली. त्यात फ्लेक्स न लावण्याचा ठराव झाला आहे. त्या ठरावाचे नगराध्यक्षा शिंदे यांनीच अवमूल्यन केले आहे. त्यासह फ्लेक्स लावताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही केले आहे. त्यामुळे नगराध्यक्षांसह त्यांचे पती उमेश शिंदे यांच्यावर फौजदारी कारवाई करावी.

हेही वाचा: कऱ्हाडच्या अर्थसंकल्पाचा 'फेर अहवाल' जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

नगराध्यक्षा शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी विनापरवानगी फ्लेक्स लावले आहेत. ते लावताना नियमांचे पालन केलेले नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. वाहतुकीला अडथळाही निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत. मुख्याधिकारी डाके यांच्याकडे याबाबत माहितीची मागणी केली होती. त्यावर मुख्याधिकारी डाके यांनी फ्लेक्स लावण्यासाठी नगराध्यक्षा शिंदे व त्यांचे पती शिंदे यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही, अगर फ्लेक्स लावण्यासाठी कोणताही पररवानगीचा अर्ज नाही, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे त्या दोघांवर कायदेशीर करावाईसाठी आम्ही आग्रही आहोत.

हेही वाचा: धक्कादायक! लसीकरण मोहिमेत 'घोटाळा', अनेकांकडून पदाचा गैरवापर

पालिकेची जानेवारीत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीत कोणत्याही प्रकारचे अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लाऊ नयेत, असा ठराव झाला आहे. तरीही नगराध्यक्षांचे पती उमेश शिंदे व नगराध्यक्षा शिंदे यांनी परवानगी न घेता, रितसर फी न भरता फ्लेक्स लावले. त्याबाबत मुख्याधिकारी डाके यांनी उमेश शिंदे यांनाही खुलासा करावा, अशी नोटीस दिली आहे.

-स्‍मिता हुलवान, सभापती, महिला व बालकल्याण समिती

Karad Municipality Speaker Smita Hulwan Is Aggressive Against Mayor Rohini Shinde Satara Political News

loading image
go to top