नेतृत्व असावं तर असं! 99 वर्षीय निष्ठावंत राजाभाऊंना वाढदिनी जावडेकरांच्या अनोख्या शुभेच्छा

बाळकृष्ण मधाळे
Friday, 18 September 2020

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी भाजपाच्या 99 वर्षीय निष्ठावंताशी त्यांच्या वाढदिवशी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. भाजपा पक्ष हा अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आज शिगेला पोहोचला असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.

सातारा : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी भाजपाच्या 99 वर्षीय निष्ठावंताशी त्यांच्या वाढदिवशी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणाले की, राजाभाऊ देशपांडे गेली जवळपास 90 वर्षे आरएसएस, जनसंघ आणि भाजपासाठी काम करत आहेत.

जावडेकर पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कराड शहरात राहणारे राजाभाऊ देशपांडे यांनी 99 वर्षे पूर्ण केली. मी त्यांच्या वाढदिवशी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. 90 वर्षे त्यांनी संघ, जनसंघासाठी सतत काम केले आहे. भाजपा पक्ष हा अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आज शिगेला पोहोचला आहे. अशा निष्ठावंतांमुळेच भाजपा प्रगतीपथावर कार्यरत आहे. 

MarathaReservation : तर मी राजीनामा देईन : उदयनराजे

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. प्रकाश जावडेकर यांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशास दृढनिश्चय व दृढ इच्छाशक्तीने नवीन उंचावर नेले आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली देश सतत प्रगतीच्या मार्गावर आहे. देव तुम्हाला निरोगी, दीर्घायुष्य देईल, असेही जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

चीन-भारत संघर्ष : महाराष्ट्रातील जवान हुतात्मा

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस होता. मात्र, वेळात वेळ काढून जावडेकरांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला प्रथम प्राधान्य देत वाढदिनी शुभेच्छा दिल्या. या त्यांच्या अनोख्या अंदाजाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जावडेकरांच्या या कृतीमुळे कार्यकर्त्यांत आदराचे स्थान निर्माण केले असून अनेकांना ही कृती भावली आहे. राजाभाऊ देशपांडे यांनाही जावडेकरांनी केलेल्या काॅलमुळे आनंदाला पारावर उरला नव्हता, ते मनोमनी शुभेच्छा स्वीकारताना खुश दिसत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Prakash Javadekar Makes A Video Call To 99-Year-Old BJP Loyalist On His Birthday Satara News