esakal | गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव; भाजप नेत्याची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra School

कोरोनामुळे कुटुंबांचे उत्पन्न घटले असतानाच शाळांच्या मनमानीस मुभा देऊन ठाकरे सरकार सामान्य माणसांची लुबाडणूक करण्यास थेट हातभार लावत आहे.

गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव; भाजप नेत्याची टीका

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतरही परीक्षा आणि प्रवेशाचा गाडा रुळावर आलेला नाही. त्यात मनमानी शुल्कवाढीची भर पडल्याने ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) धोरणाला लकवा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात सीबीएसईकडे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. राज्याच्या परीक्षा मंडळाकडे (Maharashtra State Council of Examination) अशी प्रक्रिया नसतानाही मूल्यमापन करून गुणवत्ता संपुष्टात आणण्याचा ठाकरे सरकारचा डाव आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (BJP leader Vikram Pawaskar) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (BJP Leader Vikram Pawaskar Criticizes Thackeray Government Over Education Fees bam92)

शैक्षणिक शुल्क (Education Fee) निश्चितीसाठी समिती हा निव्वळ वेळकाढूपणा असून, शिक्षण संस्थांच्या मनमानी 'फी' आकारणीस चाप लावण्यात शासन सपशेल अपयशी ठरल्याचीच ही कबुली आहे, अशी टीका करून श्री. पावसकर म्हणाले, ‘‘मूल्यमापनाच्या आधारे दहावी-बारावीचे निकाल देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपविण्याचा शिक्षण खात्याचा डाव आहे. अगोदर शुल्क निश्चितीचा प्रस्ताव खुंटीवर टांगून ठाकरे सरकारने हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप दिला. शाळाचालकांना मनमानी शुल्क आकारणीस मुभा मिळाली. गेल्या वर्षात शिक्षणाची वाताहत झाल्यानंतर यंदा ऑनलाइन शिक्षण (Online Education) देणाऱ्या शाळांनी सक्तीने फी आकारणी केल्याने हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनामुळे कुटुंबांचे उत्पन्न घटले असतानाच शाळांच्या मनमानीस मुभा देऊन ठाकरे सरकार सामान्य माणसांची लुबाडणूक करण्यास थेट हातभार लावत आहे. सरकारकडून कोणतीही मदत नाहीच. उलट लुबाडणूक करणाऱ्यांकडे डोळेझाक करून सरकारने सामान्य कुटुंबांचे जिणे संकटात टाकले आहे.’’

हेही वाचा: रेल्वेत नोकरीची संधी; महिन्याला मिळणार तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक पगार

शुल्क निश्चितीचा निर्णय घेण्यात दिरंगाई करून सरकार कोणाचे हितसंबंध जपत आहे, असा सवालही श्री. पावसकर यांनी केला आहे. मूल्यमापनाच्या आधारावर बारावी परीक्षेचे गुण निश्चित करण्याच्या निर्णयावर टीका करताना श्री. पावसकर म्हणाले,‘‘ मुळात सीबीएसईकडे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. राज्याच्या परीक्षा मंडळाकडे अशी प्रक्रिया नसतानाही मूल्यमापन करून गुणवत्ता संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव आहे. प्रवेशाबाबत शिक्षण हक्क कायद्याने घालून दिलेली बंधनेही अनेक शिक्षण संस्थांनी झुगारली आहेत. शासनाकडून निधी मिळत नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारले जात असल्याने शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवण्यास राज्य शासनच जबाबदार आहे.’’ शाळा बंद असल्यामुळे शाळांमधील ज्या सुविधा विद्यार्थी वापरत नाहीत, त्याचे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही राज्यातील अनेक शिक्षण संस्था संपूर्ण फी एकरकमी भरण्याची सक्ती पालकांवर करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तातडीने शुल्क निश्चिती करून शाळांना चाप लावावा, अशी मागणी श्री. पावसकर यांनी केली आहे.

BJP Leader Vikram Pawaskar Criticizes Thackeray Government Over Education Fees bam92

loading image