esakal | रेल्वेत नोकरीची संधी; महिन्याला मिळणार तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक पगार
sakal

बोलून बातमी शोधा

Railway jobs

रेल्वेमध्ये विविध पदांसाठी नुकत्याच जागा सुटल्या आहेत. आपण देखील या नोकरीसाठी अर्ज करू शकता.

रेल्वेत नोकरीची संधी; महिन्याला मिळणार तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक पगार

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Railway jobs : रेल्वेमध्ये विविध पदांसाठी नुकत्याच जागा सुटल्या आहेत. आपण देखील या नोकरीसाठी अर्ज करू शकता. उत्तर रेल्वेने अ‍ॅनेस्थिसिया, ईएनटी, जनरल मेडिसिन, जर्नल सर्जरी, मायक्रोबायोलॉजी आणि रेडिओलॉजी यासह विविध विभागात सीनियर रेजिडेंट (SR) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. वॉक-इन-मुलाखतीच्या आधारे पात्र उमेदवारांची भरती करण्यात येणार असून उत्तर रेल्वे भरती 2021 च्या माध्यमातून सीनियर रेजिडेंट पदासाठी एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, 27 आणि 28 जुलै 2021 रोजी वॉक-इन-मुलाखत घेण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले आहे. (Government Job In Railway Salary According To 7th Pay Commission Upto 2 lakh Rupees per Month)

दरम्यान, उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करुन घ्यावा व सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांसह 27 आणि 28 जुलै 2021 रोजी वॉक-इन-मुलाखतीसाठी हजर रहावे. तसेच वॉक-इन-मुलाखत सकाळी 8:30 वाजता अकॅडमिक ब्लॉक, उत्तर रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे सुरू होईल. सीनियर रेजिडेंट पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल-11, 7 व्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनअंतर्गत दरमहा 67,700 रुपयांपासून ते 2,08,700 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी देण्यात येईल. याशिवाय, प्रवेशयोग्य भत्ते मिळण्याचा लाभही मिळेल.

हेही वाचा: 'JEE Main'च्या तिसर्‍या सत्रासाठी 15 जुलैला जाहीर होणार Admit Card!

उमेदवाराकडे एमसीआय किंवा एनबीईद्वारे मान्यता प्राप्त संस्थांकडून संबंधित विभागात पदव्युत्तर पदवी आणि पदविका असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, MBBS नंतर, 300 खाटांच्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात कमीत-कमी तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. दरम्यान, रेल्वेमधील वरिष्ठ निवासी पदाकरिता अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांचे वय 12 जुलै 2021 पर्यंत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 वर्षे, ओबीसीसाठी 43 वर्षे आणि अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे, असेही स्पष्ट केले आहे.

Government Job In Railway Salary According To 7th Pay Commission Upto 2 lakh Rupees per Month

loading image