esakal | पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तुम्हांला कमळ फुललेले दिसेल; भाजप नेत्याचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तुम्हांला कमळ फुललेले दिसेल; भाजप नेत्याचा दावा

खरंतर कोरोनानंतर आता पुस्तकांचं गाव पुन्हा जोमात राहील यासाठी प्रयत्न करीन, शासनही त्याला नक्कीच मदत करेल असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तुम्हांला कमळ फुललेले दिसेल; भाजप नेत्याचा दावा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : यंदा तुम्हांला बंगालमध्ये कमळ फुललेले दिसेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केला. सांगली येथे जाण्यापुर्वी तावडे हे बुधवारी सातारा शहरात अल्पवेळ थांबले हाेते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांना संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेत तावडे यांनी विविध प्रश्नांवर त्यांचे मत मांडले. पूजा चव्हाण प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. यावेळी सातारा जिल्हा भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांना एखादा प्रदेश मिळतो तसा मला हरियाणा मिळाला आहे. आता पक्ष आणि आमच्यासमोर एकच धेय्य आहे ते म्हणजे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकणं. खऱ्या अर्थाने आम्ही तिथे मोठी ताकद लावल्याचे तावडे यांनी पत्रकारांशी बाेलताना नमूद केले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही १२१ तर तृणमूल काँग्रेस १६७ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होताे. हा फरक भरुन काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहाेत, त्यावर आमचे काम सुरू आहे. यावेळी तुम्हांला बंगालमध्ये देखील भाजपचे कमळ फुललेले दिसेल असा विश्वासही तावडेंनी व्यक्त केला.

दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीबाबतचा निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले हेच घेतील असे स्पष्ट करुन तावडेंनी पुस्तकांचं गावात उपक्रम झाले पाहिजेत. सध्या तेथे काही हाेत नाही असे माझ्या कानावर आलंय खरंतर कोरोनानंतर आता पुस्तकांचं गाव पुन्हा जोमात राहील यासाठी प्रयत्न करीन, शासनही त्याला नक्कीच मदत करेल असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला.

राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला

शिक्षणमंत्र्यांचं सर्व काही ऐकलं! आम्हांला काहीच नाही मिळालं

सोलो ट्रिपला जाताय.. मग, या खास गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

खेळाडूंसाठी Good News : भारतीय नौदलात नाविकांची हाेणार भरती; जाणून घ्या कधी पर्यत करायचा अर्ज

मारिया आम्हांला माफ कर

Edited By : Siddharth Latkar