

Satara Zilla Parishad Polls: BJP Distances Itself from Mahayuti Alliance
Sakal
सातारा : जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या महायुतीच्या बैठकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली, तर दुसरीकडे भाजप उमेदवारांच्या मुलाखतीत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्र्यांवर तोफ डागली. त्याचवेळी प्रत्येकाला लढण्याचे मार्ग मोकळे असल्याचे सूचक विधान सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. या सर्व घडामोडींमुळे पालिकांप्रमाणेच महायुतीला डावलून भाजप स्वबळावर वाटचाल करण्याच्या तयारीत असल्याचे तसेच शिवसेनाही राष्ट्रवादीसोबत अन्य पक्षांच्या मदतीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे संकेत मिळत आहेत.