शरद पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले 'हे' आश्‍वासन

शरद पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले 'हे' आश्‍वासन
Updated on

साताराः एमआयडीसीतील महाराष्ट्र स्कूटर्सचा प्रकल्प सुरू आपण स्वत: लक्ष घालावे, अशी कळकळीची मागणी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. मी स्वत: श्री. बजाज आणि राज्य सरकारमधील संबंधित विभागांची बैठक घेऊन हा प्रश्‍न सोडवतो, असे आश्‍वासन श्री. पवार यांनी या वेळी दिले.
 
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या खासदार शरद पवार यांची शनिवारी (ता.27) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मासच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेतली. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी सुरू करण्याबाबतचे निवेदन दिले. या वेळी मासचे अध्यक्ष उदय देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, सचिव धैर्यशील भोसले, माजी अध्यक्ष सुरिंदर अंबरदार, सहसचिव दीपक पाटील, सागर कलानी आदी उपस्थित होते.
 
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्त्वाची कंपनी आहे. मात्र, या कंपनीचे कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. या कंपनीबाबत सरकार आणि बजाज यांच्यात लवादाकडे अनेक वर्षे खटला सुरू होता. खटल्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल श्री. बजाज यांना मान्य आहे. महाराष्ट्र सरकार या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही श्री. बजाज यांच्या बाजूने निकाल दिला आहे. साताऱ्यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मितीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरू होणे आवश्‍यक आहे. सुमारे 47 एकर क्षेत्रात असलेला प्रकल्प बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक सुक्ष्म व लघुउद्योग बंद आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे. 

हे लहान- लहान उद्योग सुरू झाल्यास साताऱ्यातील औद्योगिकीकरणास चालना मिळणार असून, उद्योगाशी निगडित कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटणार आहे.'' राज्य सरकारने ठोस निर्णय घेण्याबाबत आपण स्वत: लक्ष घालावे आणि औद्योगिकीकरण आणि बेरोजगारीशी निगडित प्रश्‍न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी श्री. पवार यांच्याकडे केली. यावर मी स्वत: श्री. बजाज आणि राज्य सरकारमधील संबंधित विभागांची बैठक घेऊन हा प्रश्‍न सोडवतो, असे आश्‍वासन श्री. पवार यांनी दिले.

बा विठ्ठला घरी थांबवलंस... पावसालाही धाडलंस...

पालकांनी मुलांशी संवाद साधला नाही तर काय घडू शकते, वाचा तेजस्वी सातपुतेंचे मत  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com