esakal | पालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावरच : विक्रम पावसकर
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

पालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावरच : विक्रम पावसकर

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : जिल्ह्यातील पालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप पक्षाच्या चिन्हावर लढविणार आहे. त्यासाठी भाजप नेहमीच तयार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थीत होते. भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या बरोबरीनेच भाजपचीही ताकद आहे, असेही पावसकर यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, हेच मुळात न पटणारे आहे, असे सांगून श्री. पावसकर म्हणाले, मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर 55 टक्के मतदान भाजपला झाले आहे. ते मतदान राष्ट्रवादीच्या तोडीचेच आहे. त्यामुले आगामी निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे. बाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी परवा जिल्ह्याचा आढावा घेणारी बैठक घेतली आहे. त्या बैठकीत त्यांनी पक्षाचे आमदार, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला आहे. त्यावेळी पालिका, जिल्हा परिषेदच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लडविण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. त्यासाठी पक्षीय पातळीवरही अनुकलता दिसते आहे.

हेही वाचा: Live : अ‍ॅपलचा iPad 2021 आणि iPad mini लॉंच, पाहा फीचर्स

श्री. पावसकर, म्हणाले, भाजपच्या चिन्हावर जिल्ह्यातील पालिकांच्या निवढमुकांनासह जिल्हा परिषेदच्या निवडणुकांनाही आम्ही सामोरे जाणार आहोत. मा्गील निवडणुकांचा अब्यास केल्यास आठ पालिकांपैकी दोन पालिकेवर भाजपने सत्ता आणली आहे. त्याशिवाय तीन पालिकांच्या नगराध्यक्षांना भाजपमद्ये प्रवेश केला आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपेकी २४ जागा आम्ही लढविल्या होत्या. त्यात सात जागांवर आम्ही यशस्वी झालो आहे. यावेळी आठही पालिकांसह जिल्हा परिषेदच्या ६४ जागा बाजप पक्षाच्या चिन्हावर लडणार आहे, त्यात कोणतीही शंका नाही. जिल्ह्यातील आठ पैकी पाच पालिका बाजपच्या ताब्यात येतील तर जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपैकी ४० पेक्षाही जास्त जागांवर भाजप विजयी होईल, असे वातावरण आहे. त्यामुले भाजप चिन्हावरच निवडणुकांना सोमोरे जाणार आहे.

...पक्षाचा आदेश आल्यास जिल्हा बँकेही लढवू

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत श्री. पावसकर म्हणाले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, व खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांचे पाच ते सहा संचालक भाजपला मानणारे आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निव़डणुकीबाबत चर्चा केली आहे. या निवडणुका कधीही पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. मात्र पक्षाने ठरविल्यास त्याही निवडणुका पूर्ण ताकदीने लडविण्यास भाजप तयार आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा त्याबाबत अद्यपही कोणताही निर्णय आलेला नाही.

loading image
go to top