राज्यात गृहराज्यमंत्री आहेत, हेच कुणाला माहिती नाही; भाजप प्रदेश उपाध्यक्षांचा निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra wagh

सातारा जिल्ह्यात सोमर्डी व बेलावडे येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

राज्यात गृहराज्यमंत्री आहेत, हेच कुणाला माहिती नाही

सातारा : राज्यात गृहराज्यमंत्री आहेत हेच कुणाला माहिती नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असताना त्यांनी या पदावर का राहावे. ते त्या पदाला न्याय देऊ शकत नाहीत. याचबरोबर, अत्याचाराच्या घटनाबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) एकही शब्द उच्चारात नसून ते असंवेदनशील असल्याची सडेतोड टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी साताऱ्यात केली. (BJP State Vice President Chitra Wagh Criticizes Minister Shambhuraj Desai Satara Political News)

सातारा जिल्ह्यात सोमर्डी व बेलावडे येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पीडित मुली व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, कायदा आघाडीचे अॅड. प्रशांत खामकर, सुनेशा शहा, राहुल शिवनामे उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री, गृहराज्यमंत्र्यांसह ठाकरे सरकारवर वाघ यांनी सडकून टीका केली.

हेही वाचा: Krishna Election Result Live : काेणाला किती मते मिळाली पाहा

महिलांवरील अत्याचार या संवेदनशील विषयात सरकार आपली जबाबदारी झटकत असून ही बाब दुर्दैवी आहे. राज्यात महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असून गुन्हेगारांना सरकारचे पाठबळ मिळत आहे. शिक्षण विभागातील एक अधिकारी महिलेचा विनयभंग करतो ही घटना महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे. आता या प्रकरणामध्ये विशाखा समिती गठीत करण्यात आली. मग, तक्रात होऊन दोन महिने ही व्यवस्था काय करत होती. महिलांवर अत्याचार करणारी विकृती व्यवस्थेतून हद्दपार करण्यासाठी आम्ही सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठाण मांडणार असल्याचा परखड इशारा वाघ यांनी दिला.

हेही वाचा: कोणीच विचारात घेत नसल्याने राजेंद्र यादवांचा जळफळाट; नगराध्यक्षांची टीका

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांच्यावर दोन युवक पाळत ठेवत होते. याविषयीची माहिती पत्रकारांनी चित्रा वाघ यांना दिली. त्यावर त्या म्हणाल्या की, अंग बाई उनकी जान खतरे मे है! राज्याचा गृहराज्यमंत्री सुरक्षित नसेल तर आम्हाला गृहमंत्र्यांकडे तक्रार करून त्यांच्या सुरक्षिततेसाठी कमांडे पाठवा, असे सांगावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

BJP State Vice President Chitra Wagh Criticizes Minister Shambhuraj Desai Satara Political News

टॅग्स :Chitra Wagh