कऱ्हाड : राज्य सरकारला किंमत मोजावी लागणार : विक्रांत पाटील

सचिन शिंदे
Wednesday, 4 November 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कोरोना महामारीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम केले आहे.

कऱ्हाड : राज्याचे सरकार अपयशी ठरले आहे, त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा निश्‍चित विजय होईल, असा विश्वास भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा जिल्हा दौरा झाला. त्यावेळी त्यांनी येथे पदवीधर मतदार नोंदणी अभियान व कार्यकर्ता बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, अनुप मोरे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे उपस्थित होते. 

भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी ऍड. विशाल कुलकर्णी यांची निवड झाली. त्यांना पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. श्री. पाटील म्हणाले, ""भाजप हा एकमेव असा पक्ष आहे, ज्यामध्ये सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान, पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कोरोना महामारीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम केले आहे.

राजकारणात मोठी घडामोड! कऱ्हाडात कट्टर विरोधक येणार एका व्यासपीठावर

राज्यातील महाआघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागणार आहे. शेतकरी, विद्यार्थी वर्ग हा भरडला जातोय. त्यामुळे "पुणे पदवीधर'मध्ये भाजपचाच विजय नक्‍की आहे.''  यावेळी अतुल भोसले, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी यांची भाषणे झाली. सुदर्शन पाटसकर यांनी प्रास्ताविक केले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Youth Morcha President Vikrant Patil Criticised Maha Vikas Aghadi Satara News