
-सिद्धार्थ लाटकर
सातारा : आपल्या चार चाकीच्या काचा काळी करण्याचे फॅड पुन्हा एकदा साताऱ्यात वाढू लागले आहे. काचांवर काळी फिल्म लावणे बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही अनेकांनी आपली हौस पूर्ण करून घेत आहेत. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर काळ्या काचा असूनही त्यावर कारवाई केली जात नाही, तसेच शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वाहनांच्या काळ्या काचेप्रकरणी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.