esakal | बिकट स्थितीत पवारांचे नेतृत्वच देशाला तारेल : आमदार मकरंद पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

बिकट स्थितीत पवारांचे नेतृत्वच देशाला तारेल : आमदार मकरंद पाटील

महिलांनी गावाच्या प्रगतीत, विकासात नेहमी सर्वसमावेशक भूमिका घेतल्याचे चित्र दिसते. ही शरद पवार यांच्या क्रांतिकारी धोरणाची फलश्रुती असल्याचे मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.

बिकट स्थितीत पवारांचे नेतृत्वच देशाला तारेल : आमदार मकरंद पाटील

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : कोरोना महामारीमुळे आज समाजातील प्रत्येक घटक अडचणीत आला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट होत आहे. राज्यात तीन भिन्न पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणारे शरद पवारांचे नेतृत्व अशा परिस्थितीत देशाला निश्‍चित तारेल, असा विश्वास सामान्यांना वाटू लागला आहे, असे मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शेतकरी हॉलमध्ये रक्तदान शिबिर व तालुक्‍यातील महिला सरपंचांचा सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी प्रदेश चिटणीस प्रताप पवार, तालुका सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, अनघा कारखानीस, तालुकाध्यक्षा रंजना चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, ""राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा होता. त्यात कोविड साथीची भर पडली. त्यामुळे जीवनदान देणारे रक्त कमी पडत होते. राजकारणापेक्षाही अधिक सामाजिक आशय असलेले नेतृत्व म्हणून पवार यांचा वाढदिवस व महिला सरपंचांचा गौरव करणे, हे महिला आरक्षणाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात औचित्यपूर्ण होते. महिलांनी गावाच्या प्रगतीत, विकासात नेहमी सर्वसमावेशक भूमिका घेतल्याचे चित्र दिसते. ही शरद पवार यांच्या क्रांतिकारी धोरणाची फलश्रुती आहे.''

'गाव करील ते राव काय करील', म्हण सार्थ ठरविण्याची हीच ती वेळ : उदयनराजे

या वेळी समिंद्रा जाधव, प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ, अनघा कारखानीस, सभापती संगीता चव्हाण, सरपंच सरोज शिंगटे (खडकी) यांची भाषणे झाली. याप्रसंगी कायदा सेलच्या जिल्हाध्यक्षपदी ऍड. रवींद्र भोसले, युवतीच्या अध्यक्षा दामिनी चव्हाण, ओबीसी सेल शहराध्यक्ष नंदकुमार चिंचकर, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष सचिन अनपट व रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. बाजार समितीचे उपाध्यक्ष दीपक बाबर, राजेंद्र सोनावणे यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.

मकरंद पाटलांच्या पवित्र्यानंतर सहकारमंत्र्यांनी दिले 'किसन वीर'च्या चौकशीचे आदेश 

Edited By : Siddharth Latkar