

Historic Satara Sammelan Records Book Sales Worth Over ₹10 Crore
Sakal
सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रत्यक्ष १० लाखांहून अधिक, तर ऑनलाइन साडेसात कोटी नागरिक सहभागी झाले. हे सर्व सातारकर, साहित्य परिषद, मावळा फाउंडेशनचे पदाधिकारी व प्रशासनामुळे शक्य झाले. ९९ वे संमेलन सातारकरांच्या कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.