वडिलांसमाेरच विश्वजित बुडाला; आईने घटनास्थळी घेतली धाव

या घटनेची नोंद येथील पोलिसात झाली असून, मृतदेह सापडला तर मल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी केले आहे.
boy drown in koyna river
boy drown in koyna riversystem

मल्हारपेठ (जि. सातारा) : अंघोळीसाठी नदीला गेलेला एक अल्पवयीन मुलगा पोहताना वडिलांदेखत बुडाल्याची दुर्घटना कोयना नदीवरील (Koyna River) निसरे फरशी पुलाजवळ गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. विश्वजित विकास पंडित (वय 14, मूळ रा. विटा, सध्या रा. मल्हारपेठ, ता. पाटण) असे मुलाचे नाव आहे. दरम्यान नदीपात्रात शोधमोहीम राबवूनही त्याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नाही. (Boy Drown Koyna River Vita Satara Marathi News)


याबाबत माहिती अशी : निसरे फरशी पुलाशेजारील कोयना नदीत विश्वजित व वडील विकास पंडित हे दुपारी बाराच्या सुमारास पोहायला गेले होते. विश्वजितबरोबर अन्य दोघेही त्याचे मित्र अंघोळ करत होते. नदीला पाणीही जास्त होते. दरम्यान पोहताना पाण्याचा वेग लक्षात न आल्यामुळे विश्वजित फरशी पुलाच्या वाहत्या पाण्यातून आत गेला. तो पुढे कुठेही बाहेर दिसलाच नाही. ते कळताच वडील व मित्रांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्यांना तो सापडला नाही.

विश्वजित बुडाल्याची माहिती मित्रांनी गावात सांगितल्यावर तातडीने युवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीमध्ये उतरून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, विश्वजितचा मृतदेह सायंकाळपर्यंत मिळून आला नाही. त्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पोलिस कर्मचारी दाखल झाले. दरम्यान, मुलगा पाण्यात बुडाल्याचे समजताच मुलाच्या आईने घटनास्थळी धाव घेऊन हांबरडा फोडला. तिचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद येथील पोलिसात झाली असून, मृतदेह सापडला तर मल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी केले आहे.

boy drown in koyna river
'मराठे पाठीमागून वार करत नाहीत, समाेरुन करतात'
boy drown in koyna river
वाढत्या रुग्ण संख्येत महाराष्ट्रातील दाेन जिल्हे केंद्राच्या यादीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com