esakal | 'मराठे पाठीमागून वार करत नाहीत, समाेरुन करतात'
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

'मराठे पाठीमागून वार करत नाहीत, समाेरुन करतात'

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा शहरात आज (गुरुवार) गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shamburaj Desai) यांच्या निवासस्थाना समाेर शेण्या पेटविल्या, राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) तसेच काॅंग्रेसच्या (Congress) कार्यालयांवर सकाळी दगडफेक झाली. हा प्रकार मराठा आरक्षण रद्द (Maratha Reservation) झाल्याने घडल्याची चर्चा शहरात आहे. दरम्यान काही जण प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत आहेत, हे दुर्दैव आहे. याचा मी निषेध करतो असे सांगून आम्ही उद्याचा लढ्यात सहभागी असू पण, एकाच पक्षाला काेण टार्गेट करणार असेल तरी आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे (NCP Leader Shashikant Shinde) यांनी दिला आहे. (satara news shashikant shinde maratha reservation ncp shambhuraj desai)

आमदार शिंदे म्हणाले हा प्रकार करणा-याला पोलिसांनी २४ तासांत अटक करावी. काेणी घडवून आणला त्याचा देखील शाेध लागला पाहिजे. राज्यात मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका या समाजाच्या कायम पाठीशी राहणारीच आहे. मराठा आरक्षणाचे राजकारण केलं जात असल्याची खंत व्यक्त करुन शिंदे म्हणाले महाराष्ट्रातील वातावरण दुषीत करण्याचा व शांतता भंग करण्याचे काम कोणी करत असेल तर राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी.

या लढाईत आम्ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होतो. परंतु जर काेण जाणीवपूर्वक पक्षाला टार्गेट करण्याचे काम कोणी करत असेल तर त्याला त्याच पध्दतीने उत्तर देण्याची ताकद आमची आहे. मराठे असे काही करणार नाहीत. मराठे पाठीमागून वार करत नाहीत समोरून वार करतात अशी टिप्पणी देखील त्यांनी केली. या सर्व घटनांमागचा सुत्रधार कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: काय आहे सुपर न्यूमररी? ते खरंच मराठा आरक्षणाला पर्याय आहे?

हेही वाचा: वाढत्या रुग्ण संख्येत महाराष्ट्रातील दाेन जिल्हे केंद्राच्या यादीत

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा