सावधान! विरळी-झरे पुलाला मोठे भगदाड; जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! विरळी-झरे पुलाला मोठे भगदाड; जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

विरळी-झरे रस्त्यावरील पुलाखाली असणाऱ्या नलिकांची संख्या कमी असल्याने अती क्षमतेचे पाणी पुलावरून गेल्यामुळे पूल खचून गेला आहे. या पुलाच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवासी, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खचलेल्या व दुरवस्था झालेल्या पुलावर एखादी दुर्घटना झाल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार का? असा सवाल जनतेतून उपस्थित होऊ लागलेला आहे.

सावधान! विरळी-झरे पुलाला मोठे भगदाड; जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

sakal_logo
By
केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : विरळी-झरे रस्त्यावरील हायस्कूलनजीक असणाऱ्या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पावसाचे पाणी पुलावरून गेल्यामुळे पूल खचलेला आहे. पुलाच्या एका बाजूला मोठे भगदाड पडले आहे, तर पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

विरळीपासून म्हसवडकडे जाताना गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या पुलाची दुरवस्था झाल्यामुळे म्हसवड- विरळी बस सेवा ठप्प झाली आहे. पावसाच्या पाण्याने पूल खचून गेले आहेत. जमिनीच्या पृष्ठभागाचा विचार केला, तर पूल जमिनीच्या पृष्ठभागाच्या सरासरी आठ ते दहा फूट खोल आहे. त्यामुळे विरळी गावाभोवती असणाऱ्या डोंगराळ भागामुळे पावसाचे पाणी अती वेगाने येत असते. जास्त क्षमतेचे पावसाचे पाणी पुलावरून जात असल्याने पूल खचला आहे. पुलाच्या एका बाजूस सुरक्षा दगडाशेजारी मोठा खड्डा पडला आहे, तर काही सुरक्षा दगड उखडले आहेत. पुलावर मोठे खड्डे पडलेले आहेत. 

माणदेशी युवकांना हवीय राष्ट्रवादीत झोकून काम करण्याची संधी; मुलाखती सुरु

पुलाखाली असणाऱ्या नलिकांची संख्या कमी असल्याने अती क्षमतेचे पाणी पुलावरून गेल्यामुळे पूल खचून गेला आहे. या पुलाच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवासी, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खचलेल्या व दुरवस्था झालेल्या पुलावर एखादी दुर्घटना झाल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार का? असा सवाल जनतेतून उपस्थित होऊ लागलेला आहे. वाहनधारक व प्रवाशांचे हित लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच लक्ष घालून पुलाच्या दुरुस्तीबाबत ठोस उपाययोजना करून हा जनहिताचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून व प्रवासी वर्गातून होत आहे. दरम्यान, पावसाच्या पाण्याने पूल खचला आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करावी, अशी प्रशांत गोरड (विरळी) यांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top