esakal | याला म्हणायचं विश्वास! तहसीलदार, डीवायएसपीची मुले शिकणार सरकारी शाळेत

बोलून बातमी शोधा

याला म्हणायचं विश्वास! तहसीलदार, डीवायएसपीची मुले शिकणार सरकारी शाळेत}

जिल्हा परिषद, पालिका शाळेकडे कसलीही गुणवत्ता नसलेली शाळा म्हणून बघितले जाते. याच शाळेतून शिक्षण घेऊन अनेक मुले उच्चपदापर्यंत पोचलेली दिसतात, तरीही या शाळांकडे पालकांचा ओढा कमीच असतो.

satara
याला म्हणायचं विश्वास! तहसीलदार, डीवायएसपीची मुले शिकणार सरकारी शाळेत
sakal_logo
By
प्रशांत गुजर/सचिन शिंदे

सायगाव/क-हाड (जि. सातारा) : आजच्या काळात अनेक पालक आपल्या पाल्याला नामवंत शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न करतात. मोठे अधिकारीही त्याला अपवाद नसतात. मात्र, जावळीचे नूतन तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्यासह पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत दाखल केले आहे. पाेळ यांनी आपल्या मुलास मेढ्यातील जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळेत तर क-हाड पालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी मुलाला प्रवेश नाेंदविला आहे.

जिल्हा परिषद, पालिका शाळेकडे कसलीही गुणवत्ता नसलेली शाळा म्हणून बघितले जाते. याच शाळेतून शिक्षण घेऊन अनेक मुले उच्चपदापर्यंत पोचलेली दिसतात, तरीही या शाळांकडे पालकांचा ओढा कमीच असतो. तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी आपल्या इंद्रनीलला मेढा जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता सहावीत नुकताच प्रवेश घेतला आहे. शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा, कला- क्रीडा या सगळ्यात मेढा शाळेचे विद्यार्थी चमकत आहेत. पटसंख्येला ही शाळा सातारा जिल्ह्यात नंबर दाेन क्रमांकाची शाळा म्हणून सुपरिचित आहे. 

महाबळेश्‍वर, पाचगणीत नाईट पार्ट्या, ऑर्केस्ट्रा, हॉटेलिंगचा धिंगाणा नाही चालणार : जिल्हाधिका-यांचा आदेश 

श्री. पोळ यांनी तालुक्‍यात रुजू झाल्या झाल्यावर मेढ्यातील जिल्हा परिषद शाळेविषयी माहिती घेतली. खात्री झाल्यानंतर त्यांनी पत्नीसह शाळेत येऊन सामान्य पालकांप्रमाणे आपल्या मुलाचा प्रवेश घेतला. या वेळी मुख्याध्यापक नंदकुमार शिंदे यांनी पोळ दांपत्यांचा सत्कार केला. या वेळी नगरसेवक शशिकांत गुरव, शिक्षक सुरेश शेलार, संजय आटाळे, समीर आगलावे, विनायक करंजेकर, हेमंत जाधव, अनुपमा दाभाडे, रूपाली जाधव, पूनम घाडगे, शांताराम सपकाळ आदी उपस्थित होते. 

संस्कार व आदर्श देण्याबरोबर मराठी शाळा आजही गुणवत्ता देण्यात कुठेही कमी पडत नाहीत. फक्त विश्वासाने मुले तिथे दाखल केली पाहिजेत. या शाळांत भविष्यातील आदर्श विद्यार्थी आजही घडत आहेत अशी भावना राजेंद्र पोळ (तहसीलदार, जावळी) यांनी व्यक्त केली.

उपअधीक्षक डॉ. रणजित पाटलांचा मूलगा पालिका शाळेत दाखल

कऱ्हाड ः येथील पालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या मुलाला प्रवेश घेतला. मुध्याधिकारी रमाकांत डाके, न्यायाधीश श्री. नाईक यांच्यापाठोपाठ डॉ. पाटील यांच्याही मुलाने प्रवेश घेतल्याने शहरात चर्चा आहे. पालिकेची शाळा क्रमांक तीन गुणवत्तेत अग्रेसर आहे. शिष्यवृत्ती, नवोदयसह सैनिकी स्कूलसाठी शाळेचे दरवर्षी सर्वाधिक विद्यार्थी निवडले जातात. राज्यातील पहिली आयएसओ मानांकन मिळालेल्या शाळा म्हणून पालिकांच्या शाळेत तिचा लौकिक आहे. शाळेची पटसंख्या दोन हजार 569 इतकी आहे. डॉ. पाटील यांनी त्यांच्या मुलाला शाळा क्रमांक तीनमध्ये प्रवेश घेतला.

नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर

मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, उपजिल्हाधिकारी अरविंद कोळी, न्यायाधीश श्री. नाईक, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मुलांसोबतच आता पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील यांनीही त्यांच्या मुलाला या शाळेत प्रवेश घेतला आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर