
भोसे : नाशिक- मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये आंब्रळ (ता. महाबळेश्वर) येथील एकाचा समावेश आहे. चालक दत्ता आंब्राळे (४२, रा. आंब्रळ, ता. महाबळेश्वर) तर नित्यानंद जनार्दन सावंत (वय ६२), विद्या जनार्दन सावंत (६५), मीना जनार्दन सावंत (६८, तिघेही रा. अंधेरी, मुंबई) अशी अन्य प्रवाशांची नावे आहेत.