
दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडत असल्याससुद्धा येणाऱ्या पथकाला माहिती देणे व लवकरात लवकर या मोहिमेद्वारे आपल्याला असणाऱ्या आजाराचे निदान करून घेणे व उपचार सुरू करण्याबाबतचे आवाहन डॉ. रमेश लोखंडे यांनी केले.
मसूर (जि. सातारा) : राज्यातील कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराचे प्रमाण आत्तापर्यंतच्या तुलनेत यावर्षी अत्यंत कमी झाले आहे. त्यानुसार या संदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार 16 डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग व क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचाराविषयीचीही मोहीम मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कार्यक्षमपणे राबविणार आहाेत अशी माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी दिली.
मोहिमेत निदान न झालेले कुष्ठरुग्ण, नवीन सांसर्गिक कुष्ठरोग रुग्ण शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर दहा लाख लोकसंख्येमागे एक पेक्षा कमी करणे. समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे व कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे. क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापि वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग उपचारावर आणणे. प्रशिक्षित पथकाद्वारे ग्रहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे. संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे व औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत.
ना डांबर, ना मुरुम असा रस्ताच नकाे म्हणत, गुंडेवाडीतील युवकांनी पाडले काम बंद
याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्व आशा व आरोग्य सेवक यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. घरामधील सर्व सभासदांची कुष्ठरोग व क्षयरोग या आजारांसाठी शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. त्वचेवर फिकट, लालसर बधिर पट्टा असणे, जाड, बधिर तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे व भुवयांचे केस विरळ होणे इत्यादी लक्षणे असल्यास घरी येणाऱ्या पथकाला सांगणे. दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडत असल्याससुद्धा येणाऱ्या पथकाला माहिती देणे व लवकरात लवकर या मोहिमेद्वारे आपल्याला असणाऱ्या आजाराचे निदान करून घेणे व उपचार सुरू करण्याबाबतचे आवाहन डॉ. लोखंडे यांनी केले.
सातारा : कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना २०२१ मध्ये मिळणार १९ सुट्ट्या
Edited By : Siddharth Latkar